कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर मतदारसंघासाठी झालेल्या पोट निवडणूकीत महाविकास आघाडी आणि काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी 18,901 मतांनी विजय मिळवला आहे. या विजयामुळे कोल्हापूर उत्तर मतदारसंघाच्या पहिल्या महिला आमदार होण्याचा मान जयश्री जाधव यांना मिळाला आहे. कोल्हापूरच्या जनतेने स्वाभिमान राखला असल्याची प्रतिक्रिया जयश्री जाधव यांनी विजयानंतर दिली.
काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनामुळे ही जागा रिक्‍त झाली होती. या पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी जयश्री यांना मतदारांनी विजयी केले आहे. या निवडणुकीकडे कॉग्रेसचे नेते, पालकमंत्री सतेज पाटील विरुद्ध भाजपचे प्रदशोध्यक्ष चंद्रकांत पाटील असेच पाहिले गेले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा