पुणे : शहरात ताप, खोकला, सर्दीच्या रुग्णांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. हवामान बदलामुळे ही वाढ झालेली असल्याचे डॉ. सिध्दार्थ धेंडे यांनी सांगितले.
शहरात थंडी बरोबरच पाऊस पडत असल्यामुळे विषाणूजन्य आजारांमध्ये वाढ झालेली आहे. थंडी, ताप खोकला आणि सर्दीच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. कोरोना सारखीच लक्षणे रुग्णांमध्ये आढळत आहेत. शहरात सध्या कोरोनाबाधीत रुग्णांचा दर हा 25 टक्के झाला आहे. मात्र यामधून घाबरुन जाण्याचे काहीच कारण नाही. पुर्वीप्रमाणे कोरोनाच्या विषाणू हा घातक राहिलेला नाही. नेहमीच्या तुलनेमध्ये रुग्णालयात येणार्‍या रुग्णांची संख्या तीनपटीने वाढलेली आहे.

कोरोना सदृष्य लक्षणे ही रुग्णांमध्ये दिसून येत आहेत. पुर्वी कोरोना हा फूफ्फूसापर्यंत बाधा होत होती. त्यामुळे रुग्णांना ऑक्सीजनची गरज लागत होती. आता कोरोना हा श्वसननलिकेपर्यंतच आघात करत असल्यामुळे रुग्णांमध्ये लक्षणे कमी स्वरुपात आढळत आहेत. ज्या रुग्णांना अगोदर कोरोना होवून गेला आहे. त्यांनी अतिशय काळजी घेण्याची गरज आहे. ज्यांचे वय जास्त आहे अशा रुग्णांना सुध्दा काळजी घेतली पाहिजे असे धेंडे यांनी सांगितले.

लहान मुलांना धोका कमी

लहान मुलांना सुध्दा कोरोनाची बाधा होत आहे. १२ वर्षापर्यंतच्या मुलांना जरी कोरोनाची बाधा झाली तरी फार कमी लक्षणे दिसतात. योग्य प्रकारे आहार आणि आराम केल्यामुळे रुग्ण सहा दिवसांमध्ये बरा होत असल्याचे धेंडे यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा