१८ वर्षांचा तरुण ठार, ५९ जखमी

अवनियापुरम : तामिळनाडूमध्ये जलीकट्टू स्पर्धेत कोरोनाचे सर्व नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसते. दाक्षिणात्य राज्यांमध्ये शुक्रवारपासून जलीकट्टू या पारंपारिक खेळांच्या आयोजनाला सुरुवात झालीय. आज या खेळांचा दुसरा दिवस आहे. शुक्रवारी अवनियापुरममध्ये बैलांचा समावेश असणाऱ्या या खेळादरम्यान झालेल्या धावपळीमध्ये एका १८ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे. बैलाने शिंग मारल्याने गंभीर जखमी झालेल्या या १८ वर्षीय प्रेक्षकाचा मृत्यू झालाय.

पोंगलच्या दिवशी बैलांवर नियंत्रण मिळवण्याच्या जल्लीकट्टू या खेळाच्या आयोजनाला सुरुवात केले. पहिल्याच दिवशी या खेळादरम्यान ५९ जण जखमी झाले आहेत. मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही राज्य सरकारने खेळाच्या ठिकाणी बसण्यासाठी १५० जणांची आसन क्षमता आणि उपस्थित १५० जण अशी प्रेक्षक संख्या निश्चित केलीय.

१५० ही आसन क्षमता सामान्य संख्येच्या ५० टक्के इतकी आहे. मात्र या नियमांचे पालन केले जात नसल्याचे चित्र आहे. बऱ्याच ठिकाणी शेकडोच्या संख्येने लोक हा खेळ पाहण्यासाठी उपस्थित असल्याचे दिसते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा