मंडळ अध्यक्ष गोसावी यांचे स्पष्टीकरण

पुणे : विद्यार्थ्यांनी तणावमुक्त राहून आत्मविश्वासाने परीक्षेचे तंत्र समजावून घेत संकल्पनाधारित अभ्यास केला, तर दहावीची परीक्षा सहज सोपी आहे, असे मत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी व्यक्त केले. यंदा विद्यार्थ्यांना प्रत्येक पेपरसाठी अर्धा तास अधिकचा वेळ मिळणार असल्याचे त्यांनी नमूद केले.

दहावीच्या विद्यार्थी व पालकांसाठी रोटरी क्लब ऑफ युवा व सुपरमाईंड फाउंडेशन यांच्यातर्फे आयोजित ’सक्सेस मंत्रा’ या विनामूल्य ऑनलाईन मार्गदर्शन सत्राच्या उद्घाटनावेळी गोसावी बोलत होते. यावेळी ‘रोटरी’चे शिरीष पुराणिक, क्रांती शहा, गौरी शिकारपूर, आशा आमोणकर, दीपा भागवत, रोटरी युवाच्या अध्यक्षा तृप्ती नानल, श्रीकांत जोशी, दीपा बडवे सुपरमाईंडच्या संचालिका अर्चिता मडके आदी उपस्थित होते.

या मार्गदर्शन सत्रातील दुसरा टप्पा येत्या शनिवार दि. 15 रोजी दुपारी चार वाजता होईल. विज्ञान विषयाच्या तज्ज्ञ डॉ. सुलभा विधाते व भाषा विषयाच्या सुवर्णा कर्‍हाडकर मार्गदर्शन करणार आहेत. अधिकाधिक विद्यार्थी व पालकांनी याचा लाभ घ्यावा. सहभागासाठी विनामूल्य नोंदणी हीींिीं://लळीं.श्रू/ 3गघइपार या संकेतस्थळावर जाऊन करता येईल.

शरद गोसावी म्हणाले, की दहावीची परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्याचा आमचा विचार आहे. त्यामुळे समाज माध्यमांतील कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. अधिकृत माहिती शाळेकडून किंवा बोर्डाकडून वेळोवेळी देण्यात येईल. फेब्रुवारी अखेरपर्यंत विद्यार्थ्यांचे लशीकरण पूर्ण होईल. त्यामुळे प्रतिकारक्षमता आणि आत्मविश्वास दोन्ही वाढणार असून, विद्यार्थ्यांना यंदा परीक्षा सोपी जाईल.

जयश्री अत्रे म्हणाल्या, की पुस्तकातील गणितीय संकल्पना समजून घेतल्या, तर गणिताचा पेपर सोपा जातो. सातत्याने गणिताचा सराव आपल्याला यश मिळवून देतो. उरलेल्या 70 दिवसांत गणितासह सर्वच विषयांचा सराव विद्यार्थ्यांनी करावा. अर्चिता मडके यांनी सूत्रसंचालन केले. तृप्ती नानल यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. दीपा बडवे यांनी आभार मानले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा