२ हजार ६७४ कोरोनामुक्त

पुणे : पुण्यात शुक्रवारी दिवसभरात 5 हजार 480 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 2674 कोरोनातून बरे झाले आहेत. मागील चोविस तासात 3 जणांचा मृत्यू झाला असून यापैकी 2 रुग्ण पुण्याबाहेरील आहेत. सक्रीय रुग्णांची संख्या 28 हजार 542 वर पोहोचली आहे. यापैकी केवळ 4.15 टक्के रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

काल दिवसभरात 20 हजार 149 जणांनी कोरोना चाचणी करून घेतली. सध्या विविध रुग्णालयात 22 गंभीर रुग्णांवर तर, 208 रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत 40 लाख 68 हजार 321 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील 5 लाख 48 हजार 469 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी 5 लाख 10 हजार 793 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात 9 हजार 134 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा