माझ्या हातात चहाचा कप होता, उभ्यानं चहा पीत होतो. अचानक तोल गेला, कप सांभाळत पडल्यामुळे, हाताच्या कोपराला लागले. कपही फुटला. जर मी कप सोडला असता, तर लागले नसते. आपल्यालाही असाच अनुभव बर्‍याच वेळा आला असेल. शुल्लक गोष्टी सांभाळताना बहुमोल गोष्टी अशाच निसटुन जातात. गरज असते फक्त शुल्लक गोष्टी सोडुन देण्याची. मला विचारलच नाही; मला शुभप्रभात केले नाही;
मला निमंत्रणच दिलं नाही; माझं नावंच घेतलं नाही; माझ्या शुभेच्छा स्विकारल्या नाहीत; माझा फोन घेतला नाही; मला बसायला खुर्चीच दिली नाही; मला मानच दिला नाही. सोडून द्या हो!
सोडायला शिकलं कि मग पहा, निसटून चाललेल्या नात्यांमधे पुन्हा जीवन येईल.
सूक्ष्म अहंकार चांगली माणसं ओळखू देत नाही. तो सोडता आला की झालं. तो लगेच सोडता येणार नाही. पण कठिणही नाही. प्रयत्न करायला काय हरकत आहे.


आमची आपुलकी समजायला वेळ लागेल,
पण जेव्हा समजेल तेव्हा वेड लागेल.
लोक रुप पाहतात.
आम्ही ह्रदय पाहतो.
लोक स्वप्न पाहतात.
आम्ही सत्य पाहतो.
फरक एवढाच आहे की, लोक जगात मित्र पाहतात.
पण आम्ही मित्रांमध्येच जग पाहतो!


एक बाईने कस्टमर केअरला रागारागाने फोन लावला.
‘तीन तासांपासून तुमच्या कंपनीचे इंटरनेट चालत नाहीयं, सांगा बरं तोपर्यंत मी काय करू?’
कस्टमर केअरने काळजाला भिडेल असे उत्तर दिले, ‘ ताईसाहेब, तोपर्यंत घरातले काहीतरी काम करा की’!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा