पंजाब, उत्तर प्रदेश, गोवासह पाच राज्यात पुढील महिन्यांत विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्यानंतर पक्षांतर करणाऱ्या आमदारांची आणि नेत्यांची संख्या वाढली आहे. उत्तर प्रदेशमध्ये या आठवड्यात अवघ्या तीन दिवसांत सात भाजपा आमदारांनी पक्षाला रामराम ठोकत समाजवादी पार्टीसह इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. पंजाबही याला अपवाद नाही. पंजाबमध्ये अनेक नेते पक्ष बदलत आहेत. त्यातच आता आणखी एका नेत्याने तब्बल ५० वर्ष काँग्रेसमध्ये राहिल्यानंतर आता आम आदमी पक्षात प्रवेश केलाय. जोगींदर मान असे या नेत्याचे नाव आहे.

ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री जोगींदर मान यांनी काँग्रेसला राजीनामा दिल्याच्या एका दिवसानंतर शनिवारी आम आदमी पक्षात प्रवेश केला. जोगींदर मान यांचा राजीनामा हा काँग्रेस पक्षासाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यांनी पंजाब विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या काही आठवड्यांपूर्वी पक्षाशी असलेले त्यांचे ५० वर्षांचे संबंध तोडले आहेत.

आपचे आमदार आणि पंजाबचे सह-प्रभारी राघव चढ्ढा यांनी जोगींदर मान यांचे पक्षात स्वागत केले. ते म्हणाले की, मान यांच्यासारख्या दिग्गज नेत्याच्या आप प्रवेशामुळे राज्यात पक्षाला मोठी चालना मिळेल. चढ्ढा यांनी यासंदर्भात ट्वीट केले. जोगींदर मान हे पंजाबमधील अनुसूचित जातीचे नेते आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा