हरिद्वार : हरिद्वारममध्ये द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी पोलिसांनी पहिली कारवाई केली. पोलिसांनी जितेंद्र सिंह त्यागी म्हणजेच पूर्वाश्रमीचे वसीम रिझवी यांना अटक केली. दरम्यान अटकेच्या कारवाईनंतर यती नरसिंहानंद यांनी तुम्ही सर्व मरणार, अशा शब्दांत पोलिसांविरोधात संताप व्यक्त केला. द्वेषपूर्ण भाषण प्रकरणात यती नरसिंहानंद आरोपी आहेत. उत्तराखंडमधील हरिद्वार येथे वादग्रस्त यती नरसिंहानंद यांनी आयोजित केलेल्या हिंदूंच्या धार्मिक मेळाव्यात मुस्लिमांविरोधात विधाने करण्यात आली होती.

पोलिसांनी त्यागीला अटक केली असून ही पहिलीच अटक आहे. उत्तराखंड पोलिसांनी या प्रकरणी यती नरसिंहानंद आणि साध्वी अन्नपूर्णा यांना हजर राहण्यासाठी नोटीस बजावली आहे.

उत्तर प्रदेश शिया सेंट्रल वक्फ बोर्डाचे माजी अध्यक्ष वसीम रिझवी यांनी मुस्लीम धर्म सोडत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. यावेळी त्यांनी जितेंद्र सिंह नारायण त्यागी हे नवे नाव स्वीकाराले आहे. गाझियाबादमधील दासना देवी मंदिराचे प्रमुख पुजारी असणारे यती नरसिंहानंद यांनी त्यांच्या धर्मातराच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याआधीही त्यांनी अशी वादग्रस्त वक्तव्ये केली आहेत. सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी उत्तराखंड सरकारला या प्रकरणी 10 दिवसांत प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर करण्यात आलेली ही पहिली अटक आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा