ओमिक्रॉनबाधितांची संख्या ५ हजार ७५३ वर

नवी दिल्ली : देशात कोरोना संसर्गाची तिसरी लाट आली आहे. दैनंदिन कोरोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. याशिवाय कोरोनाचाच नवा प्रकार असलेल्या ओमिक्रॉनचे रुग्णही आढळून येत असून, कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यू संख्येतही रोज भर पडत आहे. मागील 24 तासांत देशभरात अडीच लाखांहून अधिक म्हणजे 2 लाख 64 हजार 202 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली. ही संख्या गुरुवारच्या रुग्ण संख्येच्या तुलनेत 6.7 टक्के अधिक आहे. याशिवाय 5 हजार 753 ओमिक्रॉनबाधितही आढळले आहेत.

गेल्या 24 तासांत देशभरात 1 लाख 9 हजार 345 रुग्ण कोरोनामुक्तदेखील झाल्याचे समोर आले आहे. सध्या देशात 12 लाख 72 हजार 73 सक्रिय प्रकरणे असून, पॉझिटिव्हिटी दर 14.78 टक्के आहे. याशिवाय देशात मागील 24 तासांत 315 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला असून, आजपर्यंत एकूण 4,85,350 कोरोनाबाधितरुग्णांचा देशभरात मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून कोरोना संसर्गाचा अधिक प्रमाणात प्रसार झालेल्या राज्यांना विशेष सूचनादेखील दिल्या गेल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा