मुंबई : राज्यातील 95 नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका, 2 जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांचा सार्वत्रिक निवडणुका येत्या 18 जानेवारी रोजी होत आहेत. तसेच सांगली-मिरज-कुपवाड महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकांसाठीही मतदान होणार आहे. त्यामुळे या क्षेत्रांतील मतदारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी संबंधित मतदारसंघात सावर्जनिक सुट्टी देण्याचे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे.

मतदारांनी मतदानापासून वंचित राहू नये यासाठी ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे. त्याचप्रमाणे केंद्र शासनाची शासकीय कार्यालये, निम शासकीय कार्यालये, सावर्जनिक उपक्रम, बँका इत्यादींना ही सावर्जनिक सुट्टी लागू राहणार आहे.

राज्यातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, यवतमाळ, वाशिम, नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांतील 95 नगरपंचायतींसाठी निवडणुका होत आहेत. भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेच्या प्रत्येकी 7 पंचायत समित्या आणि सांगली-मिरज-कुपवाड या महानगरपालिकेच्या पोटनिवडणुकीसाठी ही सावर्जनिक सुट्टी असेल, असे सामान्य प्रशासन विभागाने जाहीर केले आहे. मागासवर्ग प्रवर्गाच्या निवडणुकांच्या जागा आता अनारक्षित करून त्या सर्वसाधारण प्रवर्गातून भरण्यासाठी 18 जानेवारी रोजी मतदान होईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने दिली. राज्यातील 106 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद आणि त्यांअंतर्गतच्या 15 पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी सर्व जागांकरिता 21 डिसेंबर 2021 रोजी मतदान होणार होते. त्याचबरोबर चार महानगरपालिकांतील 4 आणि 4 हजार 554 ग्रामपंचायतींतील 7 हजार 130 रिकाम्या पदांच्या पोटनिवडणुकांसाठी 21 डिसेंबर रोजी मतदान होणार होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा