पुणे : पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी दिगंबर दुर्गाडे यांची निवड झाली. उपाध्यक्ष पदी सुनील चांदेरे यांची निवड करण्यात आली आहे.निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांच्या अध्यक्षतेखाली बँकेच्या नवनियुक्त संचालकांची पहिली बैठक बँकेच्या सभागृहात झाली. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदासाठी अनुक्रमे दुर्गाडे आणि चांदेरे यांचे अर्ज आले, त्यामुळे दोघेही बिनविरोध आल्याचे सोबले यांनी जाहीर केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा