होबर्ट : ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरु असलेल्या अ‍ॅशेस मालिकेतील पाचव्या आणि शेवटच्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने शानदार कामगिरी करत 59.3 षटकांत 241/6 अशी धावसंख्या उभारली. या वेळी ऑस्ट्रेलियाच्या ट्रारविस हेड याने शतक साकारले. त्याने 113 चेंडूत 101 धावा केल्या. यावेळी त्याने 12 चौकार लगावले. त्याला साथ देताना मधल्या फळीतील मार्नस लाबुशेन याने 44 धावा तर ग्रीन याने 74 धावा करत ऑस्ट्रेलियाच्या संघाला दोनशेपार नेले. सध्या अ‍ॅलेक्स कॅरी 10 धावांवर तर मिचेल स्टार्क 0 वर नाबाद आहे. तर ऑस्ट्रेलियाला 6 धावा अवांतर मिळाल्या आहेत. इंग्लंड गोलंदाजांना अखेर फॉर्म गवसला. इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉड आणि ऑली रॉबिनसनने उपहारापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था 4 बाद 85 अशी केली होती. इंग्लंडकडून ऑली रॉबिनस आणि स्टुअर्ट ब्रॉडने प्रत्येकी 2 विकेट घेतल्या. स्टुअर्ट ब्रॉडने उस्मान ख्वाजा आणि मार्नस लॅम्बुशग्नेची विकेट घेतली. मात्र स्टुअर्ट ब्रॉडने मार्नस लॅम्बुशग्नेचा उडवलेला त्रिफळा चांगलाच व्हायरल होत आहे.

इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी धाडले. त्यानंतर ऑली रॉबिन्सनने स्टीव्ह स्मिथला देखील शून्यावर बाद करत मोठा धक्का दिला. या धक्क्यातून मार्नस लॅम्बुशग्ने आणि ट्रॅव्हिस हेड (ढीर्रींळी कशरव) ऑस्ट्रेलियाला बाहेर काढण्याच्या प्रयत्नात होते. मार्नस लॅम्बुशग्नेने आक्रमक फलंदाजी करण्यास सुरुवात केली होती. हेडही त्याला आक्रमक फलंदाजी करत चांगली साथ देत होता. मात्र सामन्याचे 23 वे षटक टाकणार्‍या स्टुअर्ट ब्रॉडने लॅम्बुशग्नेचा असा काही त्रिफळा उडवला की लॅम्बुशग्ने तोंडावरच पडला. या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर लॅम्बुशग्ने स्टंप सोडून बाहेर जात ब्रॉडला फटकावण्याच्या प्रयत्नात होता. हे ब्रॉडने लगेचच हेरले. त्याने लॅम्बुशग्ने बाहेर जात आहे हे पाहून फूल लेंथ चेंडू थेट लेग स्टंपवर टाकला. यामुळे गडबडलेल्या लॅम्बुशग्नेने आडवा टाकलेला पाय पुन्हा आत घेऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत चेंडू स्टंप उखडून गेला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा