पंतप्रधान मोदींचे स्पष्ट संकेत

नवी दिल्ली : कोरोनाची सध्याची परिस्थिती लक्षात घेता देशात लॉकडाउन लागणार नाही, पण अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणायची असेल, तर स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक झोन तयार करून या आजाराला आळा घालण्याची आवश्यकता असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.
गुरूवारी देशभरातील 30 राज्यांतील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी गुरूवारी जनतेला उद्देशून केलेल्या भाषणात त्यांनी आपले मत मांडले. ते केंद्राने राज्यांना 23 हजार कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर केले होते. त्याचा वापर करून अनेक राज्यांनी आपल्या आरोग्यविषयक सुविधांचा चांगला विकास केला. भविष्यातील आरोग्यविषयक संकटे लक्षात घेता आरोग्य क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा जास्तीत जास्त चांगल्या कराव्यात.
मोदी म्हणाले, गृह विलगीकरण झालेल्या रुग्णांकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. गृह विलगीकरणाबाबतच्या नियमांचे पालन करावे संपर्कात आलेल्यांचा शोध आणि उपचार योग्य पद्धतीने केल्यास रुग्णालयात जाण्याची आवश्यकता नाही. आवश्यक असलेल्या औषधांच्या बाबतीत केंद्र सरकार सर्व राज्यांच्या पाठीशी खंबीर उभे आहे, सर्व राज्यांकडे लशीचे डोस उपलब्ध आहेत, असेही पंतप्रधान म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा