केवळ ४.३३ टक्के रुग्ण रुग्णालयात

पुणे : पुण्यात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. गुरुवारी कोरोनाबाधित सक्रिय रुग्णांच्या संख्येने 25 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. या रुग्णांपैकी केवळ 4.34 टक्के रुग्ण रुग्णालयात उपचारासाठी दाखल आहेत.

गुरुवारी दिवसभरात 5 हजार 571 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 2 हजार 335 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 25 हजार 737 वर पोहोचली असून, यापैकी फक्त 4.34 टक्के रुग्ण हे रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली. मागील चोवीस तासात 3 जणांचा मृत्यू झाला असून, एकजण पुण्याबाहेरील आहे.

काल दिवसभरात 19 हजार 868 जणांनी कोरोना चाचणी करून घेतली. सध्या विविध रुग्णालयात 19 गंभीर रुग्णांवर तर, 182 रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत 40 लाख 48 हजार 172 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील 5 लाख 42 हजार 989 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी 5 लाख 8 हजार 119 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात 9 हजार 133 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा