जालना : राज्यातील कोरोना संसर्ग एकीकडे झपाट्याने वाढत असताना, अद्यापही बरेच नागरिक लस घेण्यास टाळाटाळ करताना दिसत आहे. सरकारकडून १०० टक्के लसीकरणासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरू आहेत. मात्र नागरिकांनी देखील यासाठी पुढाकार घेणं आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लसीकरण ऐच्छिक केल्यानं अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करत असल्याचे म्हटले.

जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलताना आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले की, “कालच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लॉकडाऊन संदर्भात काहीही म्हणाले नाही. मात्र लॉकडाऊन लावताना समान नियम निकष हवे अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली आहे. लोकांनी नियम पाळावे.”

“पहिल्या डोसपासून ९८ लाख लोक वंचित आहेत. लसीकरण ऐच्छिक केल्याने अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करत आहे त्यामुळे नागरिकांना लसीकरण करण्यासाठी कायदेशीर दृष्टीने लसीकरण ऐच्छिक करता येईल का? याबाबत केंद्राकडे लेखी मागणी केल्याचे देखील ते म्हणाले. कोरोनाचा नवीन व्हेरीयंट हा म्युटेशनमधून तयार होतो. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल झालेल्या बैठकीत नवीन व्हेरीयंटला सामोरे जा असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. तसेच, त्यानुसार राज्याचा आरोग्य विभाग कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी तयार आहे.” असे ही देखील टोपे यांनी यावेळी सांगितले.

“आरोग्य सुविधा मजबूत करणं, लसीकरण वाढण्याबाबत देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सूचना केल्याचे टोपे यांनी सांगितले. आर्थिक नुकसान टाळण्यासाठी निर्बंध जेवढे टाळता येईल तेवढे लावणे टाळा असे आवाहन देखील पंतप्रधानांनी केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा