ऑलिम्पिक पदकविजेती सायना नेहवालचा भारतीय खुली बॅडमिंटन स्पर्धेतील प्रवास लवकर संपुष्टात आला. या स्पर्धेच्या दुसर्‍या फेरीत नागपूरची 20 वर्षीय बॅडमिंटनपटू मालविका बनसोडने सानियाला 21-17, 21-19 असे हरवले. हा सामना 34 मिनिटे सुरू होता.

लंडन ऑलिम्पिकमध्ये सायनाने कांस्यपदक जिंकले होते. दिग्गज खेळाडूला पराभूत केल्यानंतर मालविकाचे सोशल मीडियावरून कौतुक होत आहे. सायना नेहवालने इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेद्वारे प्रदीर्घ कालावधीनंतर बॅडमिंटन कोर्टवर प्रवेश केला. मात्र नवीन वर्षाची सुरुवात तिच्यासाठी चांगली होऊ शकली नाही. सायनाला पहिल्या फेरीत झेक प्रजासत्ताकची तिची प्रतिस्पर्धी तेरेझा स्वाबिकोवा हिला दुखापत झाल्यामुळे दुसर्‍या फेरीत प्रवेश मिळाला. पण तिला पुढचा प्रवास चालू ठेवता आला नाही.

भारताची आणखी एक स्टार शटलर पीव्ही सिंधूचा प्रवास स्पर्धेत यशस्वीपणे सुरू आहे. तिने इरा शर्माविरुद्धचा दुसरा फेरीचा सामना 21-10, 21-10 असा जिंकला. याशिवाय अश्मिता चलिहा हिनेही दुसर्‍या फेरीचा सामना जिंकला आहे. आता तिसर्‍या फेरीत त्याचा सामना पीव्ही सिंधूशी होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा