तीळगूळ घ्या…

प्रेमाने तीळगूळ देते
हक्काने स्नेह मागते
’समे’वर यायचं हेच साधन
दिस तिळा-तिळाने वर्धमान
हर संवत्सरी हेच वचन
अभिलाषी, निश्चिंतपण
भरंवसा शब्दावर
विश्वास कृतीवर
’सात्त्विकता’ घरोघर
भरभरून राहू दे
उंबराही पार करू दे…
विश्वाच्या पसार्‍यातलं
तिळाएव्हढं प्रार्थनं …
अन् मग गुळाच्या गोडीचं
घनासम बरसणं…
तीळगूळ घ्या गोड बोला.

  • कविता मेहेंदळे, मो. 9326657027

बायको : ऑपरेशन करताना रुग्णाला बेशुद्ध का करतात..? नवरा : अग बेशुद्ध नाही केलं, तर तो रुग्ण सगळं ऑपरेशन बघेल आणि शिकेल ना.. मग डॉक्टरांना कोण विचारणार..?

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा