तिसऱ्या आणि शेवटचा निर्णायक कसोटी सामना दक्षिण अफ्रिकेने ७ गडी राखून जिंकला. भारताने दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले होते. हे आव्हान दक्षिण अफ्रिकेने ३ गडी गमवून पूर्ण केले. या विजयासह दक्षिण अफ्रिकेने ही मालिका २-१ ने जिंकली आहे. भारताने कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकला होता. त्यानंतर जोरदार कमबॅक करत दक्षिण अफ्रिकेने सलग दोन सामने जिंकले. त्यामुळे विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील संघाचे

दक्षिण अफ्रिकेत कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे. पहिल्या डावात भारताने सर्व गडी गमवून २२३ धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी आलेल्या दक्षिण अफ्रिकन संघाने सर्वबाद २१० धावा केल्या. भारताला १३ धावांची आघाडी मिळाली. भारताने दुसऱ्या डावात १९८ धावा केल्या आणि दक्षिण अफ्रिकेसमोर विजयासाठी २१२ धावांचे आव्हान ठेवले होते.

दक्षिण आफ्रिकेचा डाव

एडन मारक्रमने २२ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्यानंतर डीन एल्गार आणि किगन पीटरसनने मोर्चा सांभाळला. मात्र बुमराहच्या गोलंदाजीवर डीन ३० धावा करून तंबूत परतला. किगन आणि दुस्सेननं तिसऱ्या गड्यासाठी मोठी भागीदारी केली. मात्र किगन ८२ धावांवर असताना शार्दुल ठाकुरच्या गोलंदाजीवर त्रिफळाचीत झाला. त्यानंतर रस्सी वॅन दर दुस्सेन आमि टेम्बा बवुमा या जोडीने विजय मिळवून दिला. रस्सी वॅन दर दुस्सेन याने नाबाद ४१ आणि टेम्बा बवुमा नाबाद ३२ धावा केल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा