नवी दिल्ली : देशात झपाट्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशात 2 लाख 47 हजार 417 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, कोरोनाचा नवा व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्यादेखील वाढत आहे. कोरोनाचा पॉझिटीव्हीटी दर दिवसेंदिवस वाढत असून, तो 13.11 वर पोहोचला आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.

देशभरात कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असून ओमिक्रॉनचा धोकादेखील वाढत आहे. आत्तापर्यंत ओमिक्रॉनचे 5 हजार 488 रुग्ण आढळले आहेत. सध्या देशात कोरोनाचे सक्रिय रुग्ण 11 लाख 17 हजार 531 आहेत. तर, गेल्या 24 तासात 84 हजार 825 लोक कोरोनातून बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 3 कोटी 47 लाख 15 हजार 361 जण कोरोनातून बरे झाले आहेत. देशात काल 380 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याचेदेखील समोर आले असून, आतापर्यंत देशभरात 4 लाख 85 हजार 035 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.

महाराष्ट्रात लस टंचाई

राज्यात कोव्हॅक्सिन लशीच्या मात्राची टंचाई निर्माण झाली आहे. जिल्हास्तरावरून यावर विचारणा होत आहे. केंद्रीय मंत्र्यांना कळविले आहे. 50 लाख डोस कोव्हिशील्ड आणि 40 लाख कोव्हॅक्सिनचे डोस हवे आहेत, असे महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा