नवी दिल्ली : उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरूवारी झालेल्या भाजपच्या निवडणूक मंडळाच्या बैठकीत 172 उमेदवारीसाठी इच्छुकांच्या नावावर चर्चा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी दिली.

ते म्हणाले, आम्ही 172 जागांवरील उमेदवारांबाबत चर्चा केली आहे. आम्ही उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत 2017 पेक्षाही मोठा विजय मिळविणार आहोत. 172 विधानसभा जागांवरील उमेदवारांची नावे अंतिम करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सहभागी झाले होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा