मुंबई : जगातील महान फलंदाजांपैकी एक भारताच्या सचिन तेंडुलकरला भारतीय क्रिकेट नियामक मंडळामध्ये (बीसीसीआय) मोठी जबाबदारी मिळू शकते. तेंडुलकरसोबतच सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मण हे भारतीय क्रिकेटमधील सर्वात मोठे चेहरे आहेत. सध्या गांगुली बीसीसीआयचा अध्यक्ष आहे, तर द्रविडला भारताचा मुख्य प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. त्यांच्याशिवाय लक्ष्मणला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख करण्यात आले आहे. मात्र सचिनला आतापर्यंत बीसीसीआयमध्ये कोणतीही जबाबदारी मिळालेली नाही. मात्र, आता बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी संकेत दिले आहेत, की तेंडुलकरही नव्या भूमिकेत दिसू शकतो.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा