भारताची संयुक्त राष्ट्राकडे धाव

दुबई : संयुक्त अरब अमिरातचे एक जहाज ‘रवाबी’वर स्वार असलेल्या चालक दलाच्या सात भारतीय सदस्यांना येमेनमध्ये सक्रीय असलेल्या इराण समर्थित हुती बंडखोरांनी ताब्यात घेतले. या घटनेवर तीव्र चिंता व्यक्त करत भारताने संयुक्त राष्ट्राकडे मदतीचे आवाहन केले.

रवाबी जहाजावर तैनात असलेल्या चालक दलाच्या सदस्यांशी आपले बोलणे झाल्याचे ‘युनायटेड नेशन्स’ने सांगितले. संबंधित जहाजात प्राणघातक शस्त्रे आढळली तसंच ते लाल सागरातून ताब्यात घेण्यातल्याचे हुती बंडखोरांनी म्हटले.

भारतीय चालक दलाला ओलीस ठेवल्याबद्दल संयुक्त राष्ट्रातील भारताचे राजदूत टीएस त्रिमूर्ती यांनीही चिंता व्यक्त केलीय. ‘आम्ही हुती बंडखोरांना चालक दलाच्या सदस्यांची आणि जहाजाची तात्काळ सुटका करण्याचे आवाहन करत आहोत’, असे त्यांनी म्हटले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा