नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षाव्यवस्थेतील त्रुटींबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्ती इंदू मल्होत्रा यांच्या अध्यक्षतेखालील समिती चौकशी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार बुधवारी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीत चंडीगढचे पोलीस महासंचालक, ‘एनआयए’चे महासंचालक, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल, पंजाबचे पोलीस महासंचालक (सुरक्षा) यांचा समावेश आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंजाबच्या दौर्‍यावर असताना आंदोलकांनी केलेल्या आंदोलनामुळे एका उड्डाणपुलावर पंतप्रधान मोदी यांचा ताफा अडकून पडला होता. दरम्यान, यावेळच्या सुरक्षा व्यवस्थेचे सर्व कागदपत्रे ही समितीच्या अध्यक्षांना देण्यात यावीत, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचे रजिस्ट्रार जनरल यांना दिला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा