पुणे : राज्यासह पुण्यात वाढत असलेली कोरोना बाधित रूग्णांची संख्या आणि राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या नियमांमुळे पुण्यातील लोकप्रिय सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. परिस्थितीनुसार वेळोवेळी बदलण्यात येत असलेली नियमावलीमुळे अनिश्चितता निर्माण झाली. या पार्श्वभूमीवर येत्या २ ते ६ फेब्रुवारी दरम्यान आयोजित करण्यात येत असलेला ६८ वा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव रद्द करण्यात येत आहे, अशी माहिती आर्य संगीत प्रसारक मंडळाचे कार्याध्यक्ष श्रीनिवास जोशी यांनी दिली.

यंदा भारतरत्न पंडित भीमसेन जोशी यांचे जन्म शताब्दी वर्ष असल्याने महोत्सव व्हावा अशी रसिकांची इच्छा होती. परंतु, महोत्सवाची भव्यता, व्याप्ती आणि आयोजनासाठी लागणारा वेळ बघता सद्य परिस्थितीत महोत्सव रद्द करण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उरला नसल्याचे श्रीनिवास जोशी यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा