मुंबई (प्रतिनिधी) : गेले दोन दिवस रुग्णसंख्या कमी असली, तरी कोरोनाचे संकट निवळतेय अशा भ्रमात कोणी राहू नये. अजून काही दिवस निर्बंधांचे कठोर पालन करावेच लागेल. मात्र लॉकडाउन करावे लागेल अशी कुठलीही स्थिती नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी स्पष्ट केले. फेब्रुवारीच्या मध्यापर्यंत शाळा-महाविद्यालये सुरू होऊ शकणार नाहीत, असेही संकेत त्यांनी यावेळी दिले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्या तीस राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महाराष्ट्राच्या संदर्भात काय मुद्दे मांडायचे यावरही चर्चा झाली. मंत्रिमंडळ बैठकीनंतर टोपे यांनी याबाबतची माहिती दिली. गेल्या दोन दिवसात रुग्णांचे आकडे कमी आले असले, तरी परिस्थिती निवळली आहे, अशा भ्रमात कोणी राहू नये. अजूनही राज्याचा पॉझिटिव्हीटी दर 21 टक्के, तर मुंबईचा 27 टक्के आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा