ख्राईस्टचर्च : दोन सामन्यांच्या मालिकेतील पहिली कसोटी बांगलादेशाने जिंकल्यानंतर न्यूझीलंडने दुसरी कसोटी जिंकत जोरदार उत्तर न्यूझीलंडला दिले. न्यूझीलंडच्या भूमीवर त्यांनाच पराभूत करत बांगलादेशाने पहिला धक्का दिला होता. पण दुसर्‍या कसोटीत ’टेस्ट चॅम्पियन्स’नी दमदार खेळ करत संघाला एकतर्फी मोठा विजय मिळवला. महत्त्वाची बाब म्हणजे, पहिल्या कसोटीत पराभवाचा धक्का देणार्‍या बांगलादेशी खेळाडूंना न्यूझीलंडने दुसर्‍या कसोटीत अवघ्या तीन दिवसात धूळ चारली.

500 हून जास्त धावांचा पाठलाग करताना बांगलादेशाचा संघ पहिल्या डावात 126 धावांवर बाद झाला. त्यानंतर सामन्याच्या तिसर्‍या दिवशी बांगलादेशाचा दुसरा डाव सुरू झाला. या डावातही न्यूझीलंडच्या गोलंदाजांनी बांगलादेशी फलंदाजांना चांगलेच नाचवले. फॉलो-ऑनचा डाव सुरू केल्यानंतर 80 षटकांचा खेळ रंगला. पण अखेर 278 धावांवर बांगलादेशचा दुसरा डावही आटोपला आणि न्यूझीलंडने 1 डाव व 117 धावांनी दुसरी कसोटी जिंकली.

संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड(पहिला डाव) : टॉम लेहथमन 252, विल यंग 54, कॉनवे 109, रॉस टेलर 28, डेरियल मिचेल 3, टॉम बंडेल 57, जेमीसन 4 अवांतर 14 एकूण : 128.5 षटकांत 521/6 डाव घोषीत

बांगलादेश (पहिला डाव) : 41.2 षटकांत 126/10
बांगलादेश (दुसरा डाव) : लिटन दास 102, शाहदमान इस्लाम 21, महमद नईम 24, नजमुल मोहसिन 29, मोमिनुल हक 37, लिटन दास 102, नृलुल हसन 36, एकूण : 79.3 षटकांत 278/10

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा