नवी दिल्ली : देशात कोरोना रुग्णसंख्येत वेगाने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्यांना ऑक्सिजनचा साठा पुरेशा प्रमाणात ठेवण्याचे सांगतानाच सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवून आरोग्य सुविधा केंद्रांवर वैद्यकीय ऑक्सिजन उपलब्धतेच्या सुनिश्चिततेसाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा