दिल्ली : दिल्लीत खेळल्या जात असलेल्या इंडिया खुली बॅडमिंटन स्पर्धेत कोरोनाने शिरकाव केला आहे. भारताच्या किदाम्बी श्रीकांत, अश्विनी पोनप्पा यांच्यासह सात खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळले. सातही खेळाडूंनी स्पर्धेतून माघार घेतल्याची माहिती जागतिक बॅडमिंटन महासंघाकडून देण्यात आली. भारत सध्या कोरोनाच्या विळख्यात सापडला आहे. देशात दररोज सुमारे दोन लाख रुग्णांची नोंद होत आहे. त्याच वेळी, दिल्लीतही दररोज संक्रमित होणाऱ्यांची संख्या २० हजारांच्या जवळपास आहे. इतर खेळाडूंमध्ये रितिका राहुल, त्रिशा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन अमान आणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे.

BWF कडून सांगण्यात आले की, या स्पर्धेत मंगळवारी भाग घेतलेल्या सर्व बॅडमिंटनपटूंची कोरोना चाचण्या करण्यात आली. त्यांच्या अहवालात या सात खेळाडूंना संसर्ग झाल्याचे समोर आले. या बॅडमिंटन खेळाडूंसोबत दुहेरीत खेळलेल्या खेळाडूंनीही आपली नावे मागे घेतली आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा