पैसे असून साधं राहीलं तर भिकारडा म्हणतात …
पैसा बर्‍यापैकी खर्च केला तर माजुरडा म्हणतात …
सगळ्यांशी मनमोकळेपणानं बोललं तर बकबक करतो म्हणतात…
कमी बोललो तर स्वतःला शहाणा समजतो म्हणतात …
दानधर्म नाही केला तर कंजुष म्हणतात …
भरपूर दानधर्म केला तर दोन नंबर पैसेवाला म्हणतात …
बायकोचं ऐकलं तर बायकोचा बैल म्हणतात …
बायकोचं नाही ऐकलं तर काहीतरी भानगड आहे म्हणतात …
तब्बेत चांगली तर फुकटंच खाऊन सुटलाय म्हणतात …
तब्बेत कमी केली तर काहीतरी आजार झाला असणार असं म्हणतात …
सगळ्या कार्यक्रमांना हजेरी लावली तर ह्याला काही काम धंदा नाही असं म्हणतात …
कार्यक्रमांना नाही गेलं तर ह्याला माणुसकी नाही म्हणतात …
समाजासाठी काही केले तर या पाठीमागे काही स्वार्थ असणार असं म्हणतात …
समाजासाठी काही नाही केले तर काही कामाचा नाही असं म्हणतात …
लोक पायी चालू देत नाहीत, अन गाढवावर बसूही देत नाहीत …
लोकं सगळी अशीच असतात, ते त्यांचं काम करत असतात, आपण आपलं काम करायचं …
शेवटी आपलं आपणच ठरवायचं जीवन कसं जगायचं, याचाच अर्थ ऐकावे जनाचे करावे मनाचे


आयुष्यात बालपणीचाच काळ फक्त सुखाचा असतो.
कारण अहंकारापासून तो लांब असतो.
हम भी कुछ है। हा भाव एकदा जागा झाला की त्यानंतर सुरू होते झुंज, स्पर्धा, तर्क आणि संघर्ष.
आणि त्यामध्येच हरवून जातात सुखाचे क्षण…


जेव्हा फ्रीजमधील थंड पाणी प्याल तेव्हा न विसरता पाणी भरून ठेवा;
नाहीतर लेक्चर पाण्याच्या बाटली पासून सुरू होईल आणि
’मोबाईल, अभ्यास आणि बेरोजगारी’ वर येऊन संपेल..!
अखिल भारतीय घरीच पडीक संघटना!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा