केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात सुरू असलेली तिसरी आणि निर्णायक कसोटी अत्यंत रोमांचक वळणावर पोहोचली आहे. आज या सामन्याचा तिसरा दिवस आहे. भारताने दुसऱ्या डावात आज २ बाद ५७ धावांवरून पुढे खेळण्यास सुरुवात केली. आफ्रिकेच्या गोलंदाजीसमोर राहुल-मयंक पुन्हा अपयशी ठरले. दुसऱ्या दिवस अखेर भारताकडे ७० धावांची आघाडी होती. दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव २१० धावांवर आटोपला. कीगन पीरसनने झुंजार फलंदाजी करत ७२ धावांची खेळी केली. भारताकडून जसप्रीत बुमराहने मारा करत ५ बळी टिपले.

भारताचा दुसरा डाव

भारताचा सलामीवीर फलंदाज केएल राहुल दुसऱ्या डावातही अपयशी ठरला. वेगवान गोलंदाज जानसेनने त्याला १० धावांवर मार्करामकरवी झेलबाद केले. तर मयंक अग्रवाल (७) धावांवर कगिसो रबाडाचा बळी ठरला. त्यानंतर कप्तान विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी संघाला अर्धशतक गाठून दिले. त्यानंतर जानसेनने पुजाराला जास्त वेळ टिकून दिले नाही. त्याने पुजाराला वैयक्तिक ९ धावांवर मार्करामकरवी झेलबाद केले. त्यानंतर अजिंक्य रहाणे मैदानात आला. परंतु तो सुद्धा पुन्हा अपयशी ठरला. रबाडाने रहाणेला (१) बाद केले. रहाणेनंतर विराटची साथ देण्यासाठी ऋषभ पंत मैदानात आला आहे.

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), रवीचंद्रन अश्विन, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, उमेश यादव

दक्षिण आफ्रिका – डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रुसी व्हॅन डर ड्यूसेन, टेम्बा बावुमा, काइल वेरेन (यष्टीरक्षक), मार्को जानसेन, कगिसो रबाडा, केशव महाराज, डुआन ऑलिव्हियर, लुंगी एनगिडी.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा