केपटाऊन : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. बुधवारी या सामन्याचा दुसरा दिवस होता. दुसर्‍या दिवशी भारताच्या गोलंदाजांच्या भेदक कामगिरीमुळे भारतीय संघ हा 13 धावांनी आघाडीवर राहीला. आफ्रिकेला 73.1 षटकांत 209 धावा करता आल्या. यावेळी त्यांचा संपुर्ण संघ तंबूत परतला. सलामीवीर एल्गर 3 धावा करत तर त्याच्याबरोबरचा मार्कराम 8 धावा करत तंबूत परतले. केशव महाराज 25 धावा करत उमेशच्या गोलंदाजीवर बाद झाला. पीटरसन याने 72 धावा करत अर्धशतकी कामगिरी केली. मात्र त्याला बुमराहने पुजाराकडे झेल देत बाद केले. आफ्रिकेच्या अंतिम टप्प्यात लुंगी एनगिडी, याने 2 धावा केल्या. तर ऑलिव्हर याने 10 धावा करत माघारी परतले. मॅक्रो जॉनसन 7 धावा तर काइल 0 धावावर बाद झाला. टेंबा बहुवामा याने 28 धावा तर ड्युसन हा 21 धावांवर तंबूत परतला.

पहिल्याच दिवशी दोन्ही संघात जोरदार टक्कर पाहायला मिळाली. आफ्रिका संघाने 8 षटकांत 1 बाद 17 धावांरून पुढे खेळायला सुरुवात केली. दक्षिण आफ्रिकेचा कप्तान डीन एल्गरला काल लवकर तंबूत धाडण्यात भारताला यश आले. तत्पूर्वी विराट कोहलीने भारतीय संघात पुनरागमन करत नाणेफेक जिंकली. प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आफ्रिकेच्या वेगवान आणि तिखट मार्‍यासमोर विराट वगळता भारताचे फलंदाज ढेपाळले. त्यांचा पहिला डाव 223 धावांवर संपुष्टात आला. विराटने 79 धावा करत संघाला आधार दिला.

वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा कप्तान डीन एल्गरला (3) लवकर तंबूत पाठवत भारताला पहिले यश मिळवून दिले. पहिल्या दिवसअखेर एडन मार्कराम आणि नाईट वॉचमन केशव महाराज नाबाद होते. दुसर्‍या दिवसाच्या खेळाला सुरुवात होताच बुमराहने सुरेख पद्धतीने मार्करामचा (8) त्रिफळा उडवला. संघाचा अर्धशतकी पल्ला गाठण्यापूर्वी केशव महाराजही (25) उमेश यादवच्या गोलंदाजीवर तंबूत परतला. त्यानंतर कीगन पीटरसन आणि रुसी व्हॅन डर ड्यूसेन यांनी संघाला सावरलं. या दोघांनी संयमी भागीदारी रचत संघाचे शतक फलकावर लावले. उमेश यादवने ड्यूसेनला (21) बाद करत ही जोडी फोडली. त्यानंतर आलेल्या टेंबा बावुमाने पीटरसनला थोडी साथ दिली. पीटरसनने आपले अर्धशतक पूर्ण करत एका बाजूला किल्ला लढवला. वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने आधी बावुमाला आणि त्यानंतर काइल वेरेनला बाद करत आफ्रिकेला अजून संकटात टाकले. 159 धावावर यजमानांनी 6 फलंदाज गमावले. तर बुमराहने जानसेनची दांडी गूल करत आफ्रिकेला सातवा धक्का दिला. चहापानापर्यंत त्यांनी 7 बाद 176 धावा केल्या. पीटरसन 70 धावांवर नाबाद आहे.

मयंक अग्रवाल आणि केएल राहुल यांनी भारताच्या डावाची सुरुवात केली. भारताचं अर्धशतक पूर्ण होण्यापूर्वी हे दोघे तंबूत परतले. डुआन ऑलिव्हियर ने राहुलला (12) तर कगिसो रबाडाने एडन मार्करामला (15) झेलबाद केले. लंचपर्यंत विराट कोहली आणि चेतेश्वर पुजारा यांनी भारताचा डाव सावरला. लंचनंतर भारताने शतक पूर्ण केले पण डाव गडबडला. चांगल्या लयीत खेळणार्‍या पुजाराला वेगवान गोलंदाज मार्को जानसेनने झेलबाद केले. त्यानंतर आलेला अजिंक्य रहाणे रबाडाचा बळी ठरला. पुजाराने 7 चौकारांसह 43 तर रहाणेने 9 धावा केल्या. चहापानापर्यंत भारताने 54 षटकात 4 बाद 141 धावा केल्या. चहापानानंतर भारताने पंतच्या रुपात आपला पाचला फलंदाज गमावला. जानसेनने त्याला बाद केले. दरम्यान विराटने संयमी अर्धशतक फलकावर लावले. 167 धावांत भारताने 5 फलंदाज बाद झाले. त्यानंतर भारताचे एकापाठोपाठ एक फलंदाज बाद होत राहिले. विराटने आक्रमक पवित्रा धारण करत झटपट धावा जोत संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. तो आज शतकाचा दुष्काळ संपवणार असे वाटत असताना बाद झाला. ऑफ स्टम्पबाहेरील चेंडूवर विराटला रबाडाने तंबूत धाडले. विराटने 201 चेंडूंचा सामना करत 12 चौकार आणि एक षटकारासह 79 धावा केल्या. विराट बाद झाल्यानंतर आफ्रिकेने भारताचा पहिला डाव लवकर संपुष्टात आणला. पहिल्या डावात भारताने 77.3 षटकात सर्वबाद 223 धावा केल्या. आफ्रिकेकडून रबाडाने 4, जानसेनने 3 बळी घेतले. लुंगी एनगिडी, डुआन ऑलिव्हियर आणि केशव महाराज यांना प्रत्येकी एक बळी मिळाला.

दोन्ही संघांमधील मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. यावेळी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेत इतिहास रचण्याची संधी आहे. टीम इंडियाला आजपर्यंत दक्षिण आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. अशा स्थितीत त्यांना प्रथमच येथे कसोटी मालिका जिंकण्याची सुवर्णसंधी आहे.

संक्षिप्त धावफलक

आफ्रिका (पहिला डाव): एल्गर 3,मार्कराम 8, केशव महाराज 25,पीटरसन 72,ड्युसन 21, टेंबा बहुवामा 28, मॅक्रो जानसेन 7, रबाडा 15,लुंगी एनगिडी 2,ऑलिव्हर 10 एकूण 73.1 षटकांत 208/9
गोलंदाजी : बुमराह 22-7-42-5, उमेश यादव 16-3-64-2, शामी 16-4-39-2, शार्दुल ठाकुर 11.1-2-36-1

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा