मुंबई : भारताच्या गानकोकिळा आणि भारतरत्न लता मंगेशकर यांना कोरोना आणि न्यूमोनियाची लागण झाल्यानंतर मुंबईच्या ब्रीच कॅन्डी रुग्णलयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी आणि त्या लवकर ठीक व्हाव्यात यासाठी देशाभरातून लोक प्रार्थना करत आहे. सध्या डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवले आहे. आज लता मंगेशकर यांची बहीण आशा भोसले यांनी पहिल्यांदाच लतादीदींच्या प्रकृतीवर आपली प्रतिक्रिया दिली.

एका खासगी वृत्तपत्राशी बोलताना आशा भोसले म्हणाल्या,’‘रुग्णालयाने ठरवून दिलेल्या वेळापत्रकाप्रमाणे लतादीदींना औषधं दिली जात आहेत. पण रुग्णालयाच्या नियमाप्रमाणे दीदींना भेटण्याची परवानगी देण्यात आलेली नाही. मी त्यांना भेटण्यासाठी गेले होते पण त्यांनी मला भेटण्याची परवानगी दिली नाही. कोरोनाचे वाढते संक्रमण पाहता रुग्णालयाकडून नियमांचे काटेकोर पालन केले जात आहे.’’

आशा भोसले पुढे म्हणाल्या, ‘या दरम्यान माझी देखील तब्येत काहीशी ठीक नाही. मागच्या काही दिवसांपासून मलाही खोकला आणि सर्दीचा त्रास जाणवत आहे. पण हे बदलेल्या वातावरणामुळे आहे. मला कोरोनाची लागण झालेली नाही. दीदींच्या प्रकृतीमध्येही सुधारणा होत आहे. आता अगोदरच्या तुलनेत त्यांची प्रकृती चांगली आहे. आमची बहीण उषा मंगेशकर सातत्याने दीदी आणि माझ्या संपर्कात असून ती आम्हाला दीदींच्या प्रकृतीची माहिती देत असते.’

‘गायिका लता मंगेशकर सध्या अतिदक्षता विभागात हेत. पण त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे’ अशी माहिती दीदींवर उपचार करत असलेले डॉक्टर प्रतीत समदानी यांनी दिली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा