एसटी कामगारांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अनुपस्थितीत शरद पवार यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासह परवा बैठक घेतली होती. यावर भाजपने आक्षेप घेतला आहे. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा पदभार शरद पवार यांच्याकडे दिला आहे का? असा सवाल भाजप आमदार राम कदम यांनी केला होता. याबाबत विचारता, राम कदम यांच्या ज्ञानाबद्दल कौतुक वाटते, असा टोला पवार यांनी लगावला. एखाद्या कामगार संघटनेने मला बोलावले, आणखी कुणाला बोलावले तर लोकशाहीत त्यांच्याशी चर्चा करण्याचा अधिकार आहे की नाही? या अधिकाराने चर्चा केली असेल तर त्यात काहीच चुकीचे नाही. मुख्यमंत्री हेच महाराष्ट्राचे निर्णय घेतात. त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना बैठकीला प्रत्यक्ष हजर राहता आले नाही. परंतु, परिवहन मंत्र्यांनी जी काही चर्चा झाली ती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहचवली असणार. शेवटी धोरणात्मक निर्णय मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री एकत्रित विचारानेच घेतात, शरद पवार यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा