पुणे : मेहता पब्लिकेशनचे संचालक सुनील मेहता यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. किडनी स्टोनवरील उपचारांसाठी त्यांना पूना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अवयव निकामी झाल्याने त्यांची प्राणज्योत मालवली.

दोन दिवस त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले होते. आज बुधवारी दुपारी चार वाजता त्यांचे निधन झाले असून उद्या त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. प्रकाशन व्यवसायाला आधुनिक रुप देण्याऱ्या प्रकाशकांमध्ये त्यांचे नाव आघाडीने घेतले जाते. आजच्या अनेक ख्यातनाम लेखकांना त्यांनीच आपल्या प्रकाशन संस्थेच्या माध्यमातून ओळख मिळवून दिली. त्यांनी अनेक विषयांना हात घालणारी दर्जेदार अशा पुस्तकांची निर्मिती करण्यावर सातत्याने भर दिला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा