पुणे : पुण्यात सोमवारी दिवसभरात रविवारी 3 हजार 67 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 857 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत. दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 17 हजार 98 वर पोहोचली आहे. त्यापैकी फक्त 5.10 टक्के रुग्ण रुग्णालयात उपचार घेत आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाने दिली.

कोरोना व ओमिक्रॉनच्या रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. शहरात कोरोना निदान चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. गेल्या सात दिवसांपासून 18 हजारांहून अधिक तपासण्या करण्यात येत आहेत. सोमवारी दिवसभरात 15 हजार 139 कोरोना निदान चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यापैकी 3 हजार 67 रुग्ण बाधित सापडले आहेत.

शहरात सध्या विविध रुग्णालयात 17 गंभीर रुग्णांवर तर, 143 रुग्णांवर ऑक्सिजनसह उपचार सुरू आहेत. शहरात आतापर्यंत 39 लाख 92 हजार 520 जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. यातील 5 लाख 29 हजार 102 जण कोरोनाबाधित आढळून आले. त्यापैकी 5 लाख 2 हजार 875 जण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत शहरात 9 हजार 129 जणांचा मृत्यू झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा