मुंबई : भारतीय अष्टपैलू क्रिकेटपटू वॉशिंग्टन सुंदरला कोरोनाची लागण झाली आहे. आता तो 19 जानेवारीपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सुरू होणार्‍या तीन सामन्यांच्या एकदिवसांच्या मालिकेतून बाहेर जाऊ शकतो. 22 वर्षीय सुंदर भारतीय एकदिवसाच्या संघातील इतर खेळाडूंसह आज दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार होता.मात्र आता या दौर्‍यावर जाणे कठीण झाले आहे. भारतीय वनडे संघाचे खेळाडू सध्या मुंबईतील एका हॉटेलमध्ये आहेत, आज संघ दक्षिण आफ्रिकेला रवाना होणार आहे. सुंदरचे प्रदीर्घ कालावधीनंतर भारतीय संघात पुनरागमन झाले होते. इंग्लंड दौर्‍यावर सराव सामन्यादरम्यान झालेल्या दुखापतीमुळे तो जवळपास 6 महिने भारतातून बाहेर होता. यामुळे तो यूएईमध्ये खेळल्या जाणार्‍या आयपीएल 2021 आणि टी-20 विश्वचषकाच्या दुसर्‍या टप्प्यातूनही बाहेर पडला.

एकदिवसाची मालिका

19 जानेवारी 2022 – बोलंड पार्क, पार्ल – दुपारी दोन वाजता
21 जानेवारी 2022 – बोलंड पार्क, पार्ल – दुपारी दोन वाजता
23 जानेवारी 2022 – न्यू लँड्स क्रिकेट ग्राऊंड, केपटाऊन – दुपारी दोन वाजता

एकदिवसाच्या सामन्यांसाठी भारतीय संघ

के. एल. राहुल (कर्णधार), शिखर धवन, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, व्यंकटेश अय्यर, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), यजुर्वेंद्र चहल, आर. अश्विन, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, प्रसिद्ध कृष्णा, शार्दुल ठाकूर, सिराज

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा