पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिलेल्या निर्देशांनुसार पुणेकरांच्या आवडत्या सिंहगडावरही प्रवेश बंद करण्यात आला आहे. पुढील सूचना येईपर्यंत नागरिकांना गडावरील प्रवेश बंद राहील, असे पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील यांनी सोमवारी स्पष्ट केले. या निर्णयामुळे पुणेकरांना शनिवार आणि रविवारच्या हक्काच्या सुट्टीदिवशी गडावर भटकंतीला मुरड घालावी लागणार आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दीची पर्यटन स्थळे बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याने पुणे वन विभागाच्या अखत्यारीतील सिंहगड किल्लाही पर्यटनासाठी बंद करण्यात आला आहे. पुढील सूचना येईपर्यंत गड बंद राहणार असल्याने नागरिकांनी पायथ्याशी गर्दी करू नये. विशेषत: आठवड्याच्या शेवटी परिसरात पर्यटनाचे बेत आखू नये, असे आवाहनही वन विभागाने केले आहे. गडावर जाणारा पायवाटेचा आणि वाहतुकीचा रस्ता बंद राहील, असेही विभागाने स्पष्ट केले आहे.

गड बंद राहणार असल्याने परिसरातील रेस्टॉरंट, फार्म हाउस, गडावरील खाणावळी चालकांच्या उत्पन्नावर ‘संक्रांत’ येणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता असताना गेल्याच महिन्यात पुणे आणि मुंबईतील हजारो पर्यटकांनी या भागात भटकंतीसाठी गर्दी केली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा