पुणे : महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) चे शासनात विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी दोन महिन्यांपासून एसटीचे कामगार संपावर ठाम आहेत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी कंत्राटी कामगारांच्या मदतीने विविध मार्गावर बस मार्गस्त केल्या जात आहेत. सोमवारी पुण्यातून 23 कंत्राटी कामगाराच्या मदतीने 15 बस सोडण्यात आल्या, तर कामावर हजर झालेल्या कर्मचार्‍यांमार्फत 150 बस सोडण्यात आल्या.
संपाला सुरूवात झाल्यापासून सुमारे 1100 कर्मचारी कामावर हजर झाले आहेत. त्यांच्या मदतीने विविध मार्गावर रोज 150 बस सोडल्या जात आहेत. प्रशासनाला कंत्राटी कामगार उपलब्ध झाल्याने धावणार्‍या बसची संख्या वाढली आहे. काल प्रशासनाला 23 कंत्राटी कामगार ठेकेदाराकडून उपलब्ध झाले होते. त्यांच्या मार्फत दिवसभरात 15 बस मार्गस्त करण्यात आल्या. मंगळवारी आणखी 50 कंत्राटी कामगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे आजपासून धावणार्‍या बसच्या संख्येत आणखी वाढ होणार असल्याचे एसटी प्रशासनाने सांगितले.
पुणे शहर आणि जिल्ह्यात एसटीचे 13 आगार आहेत. त्यापैकी 9 आगारातून प्रवासी वाहतूकीला सुरूवात झाली आहे. तर अद्यापही 4 आगार बंद आहेत. जे आगार बंद आहेत. तेथून प्रवासी वाहतूक करण्यास खासगी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. ज्या आगारातून बस धावत आहेत. तेथूनही गरजेनुसार खासगी वाहनांना प्रवासी वाहतूकीस परवानगी देण्यात येत आहे. कंत्राटी कामगारांची संख्या वाढल्यास बहुतांश मार्गावर बस धावतील. प्रवाशांचीही गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
सात मार्गावर धावल्या बस
कंत्राटी कामगार उपलब्ध झाल्यामुळे धावणार्‍या बसची संख्या वाढली आहे. सोमवारी पुण्यातून दादर, औरंगाबाद, सोलापूर, इंदापूर, बारामती, सासवड, पंढरपूर आदी मार्गावर बस धावल्या. मंगळवारी आणखी 50 कंत्राटी कामगार उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतूकीच्या मार्गात वाढ होणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा