पुणे : राज्यात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे शनिवार पासून येत्या सोमवारपर्यंत राज्यात काही ठिकाणी मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने गुरूवारी वर्तविला.
मागील 24 तासात राज्यासह गोव्यात हवामान कोरडे होते. शुक्रवारी धुळे, नंदुरबार, नाशिक परिसरात मेघगर्जनेसह वीजांचा कडकडाटात होणार आहे. मरांवाड्यात रविवारपर्यंत हवामान कोरडे असणार आहे. सोमवारी मात्र औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड आणि हिंगोली परिसरात वीजांच्या कडकडाटात हलक्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. दोन दिवसांनंतर मात्र बहुतांश विदर्भात मेघगर्जनेह पाऊस हजेरी लावणार आहे. तसेच कोकण, गोव्यातही काही ठिकाणी पाऊस पडणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा