४८ तासांत १८० हून अधिक डॉक्टरांना लागण

मुंबई : राज्यात कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. ओमिक्रॉन प्रकारामुळे कोरोना रुग्णसंख्या तिपटीने वाढत असल्याने राज्यात कोरोनाची तिसरी लाट आल्याचे म्हटले जात आहे. त्यातच आरोग्य कर्मचारी आणि डॉक्टर कोरोनाबाधित होत असल्याने चिंतेत भर पडली आहे. राज्यात आतापर्यंत 180 हून अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली असून त्यामध्ये मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील 61 निवासी डॉक्टरांचा समावेश आहे.

या १८०हून अधिक डॉक्टरांमध्ये मुंबईतील जे. जे. रुग्णालयातील 61 निवासी डॉक्टरांबरोबरच सायनच्या 35, केईएमच्या 40, नायरच्या 35 आणि कूपरच्या 7 डॉक्टरांचा समावेश आहे. अवघ्या 48 तासांत राज्यातील 180 हून अधिक निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्यामुळे चिंतेत भर पडली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा