नवी दिल्ली : देशातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या दीड लाखांवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 37 हजार 379 नवे रुग्ण आढळून आले. मागच्या सहा दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत 1 लाख 23 हजार 191 जणांची भर पडली. तर सक्रिय रुग्णसंख्या 1 लाख 71 हजार 839 वर पोहोचली.

गेेल्या 24 तासांत 11 हजार 7 रुग्ण कोरोनामुक्त झाले. तर, 124 जणांचा मृत्यू झाला. एकूण कोरोना रुग्णसंख्या 3 कोटी 49 लाख 60 हजार 261 वर पोहोचली. त्यापैकी, 3 कोटी 43 लाख 6 हजार 414 जणांनी कोरोनावर मात केली. तर बळींची संख्या 4 लाख 82 हजार 17 वर पोहोचली.

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.13 टक्के तर मृत्युदर 1.38 टक्के इतके आहे. गेल्या 24 तासांत 11 लाख 54 हजार 302 जणांनी तर आतापर्यंत 68 कोटी 24 लाख 28 हजार 595 जणांनी कोरोना चाचणी केली. गेल्या 24 तासांत 99 लाख 27 हजार 797 जणांनी कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली. तर आतापर्यंत 1 अब्ज 47 कोटी 70 लाख 18 हजार 464 जणांना कोरोना लस मात्रा देण्यात आली.

राज्यात कोरोनाचे १८ हजार ४६६ रुग्ण

मुंबई, (प्रतिनिधी) कोरोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत असून, गेल्या 24 तासांत राज्यात 18 हजार 466 नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे कठोर निर्बंध लागू करण्याची तयारी सरकारने सुरू केली आहे.

मुंबई शहरात काल तब्बल 10 हजार 860 नवीन रुग्णांची भर पडली. ही रुग्णसंख्या 20 हजारांपर्यंत गेल्यानंतर मुंबईत लॉकडाउन करावे लागेल, असे सूतोवाच मुंबई महापालिका आयुक्त व महापौरांनी केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा