पुणे : सीएनजी गॅसच्या मुख्य पुरवठा पाईपलाईनच्या देखभाल दुरूस्तीचे काम केेले जाणार आहे. त्यामुळे 6 ते 11 जानेवारी दरम्यान शहरातील सीएनजी गॅस पुरवठा विस्कळीत होणार आहे. तसेच काही ठिकाणचे सीएनजी पंप बंद असणार आहेत. त्यामुळे सीएनजी वाहनांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
एमएनजीएलच्या मुख्य सीएनजी गॅस पुरवठा करणार्‍या पाईपलाईनची देखभाल दुरूस्ती केली जाणार आहे. शहरात रोज सीएनजीवर धावणार्‍या रिक्षांची संख्या सुमारे एक लाखापेक्षा अधिक आहे, तर सीएनजीवर धावणार्‍या चारचाकी वाहनांची संख्याही लक्षणीय आहे. सीएनजी गॅसचा पुरवठा खंडीत झाल्यास वाहनचालकांना मोठा फटका सहन करावा लागणार आहे. तर सीएनजी गॅसअभावी काही गाड्या बंद ठेवाव्या लागणार आहेत.
शहर आणि उपनगरात मिळून सीएनजी गॅस पंपाची संख्या सुमारे 25 ते 30 इतकी आहे. गॅसचा पुरवडा विस्कळीत झाला की, या पंपावर लांबच लांब रिक्षाच्या रांगा लागतात. चारचाकी वाहन चालक मात्र सीएनजी गॅस न मिळाल्यास पेट्रोलचा वापर करतात. त्यामुळे चारचाकी वाहने बंद राहणार नाहीत. मात्र रिक्षाला गॅस न मिळाल्यास त्या बंदच ठेवाव्या लागतील. तसेच 6 ते 11 जोनावरी दरम्यान सीएनजी गॅस पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा पाहण्यास मिळणार आहेत.
रिक्षाला मोठा फटका बसणार
शहरातील सुमारे एक लाखापेक्षा अधिक रिक्षा सीएनजी गॅसवर चालतात. मात्र पंप बंद राहिल्यास अथवा गॅस पुरवठा विस्कळीत झाल्यास त्याचा मोठा फटका रिक्षाला बसेल. रिक्षाची गॅसची टाकी 4 किलोची असते. मात्र प्रत्यक्षात त्यात 3.5 किलो गॅस बसतो. एका किलो गॅसवर रिक्षा 30 ते 35 किलो मीटर धावते. गॅस दर दीड दिवसांला रिक्षा चालकाला गॅस भरावा लागतो. गॅस न मिळाल्यास रिक्षा चालकांना रिक्षा बंद ठेवावी लागेल.नितीन पवार, सरचिटणीस, रिक्षश पंचायत

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा