पुणे : राज्यासह पुण्यातील किमान तपमानात लक्षणीय वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून थंडीत मोठी घट झाली आहे. येत्या रविवारपर्यंत वाढलेले किमान तपमान स्थिर राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे तोपर्यंत शहरातून थंडी गायब असणार आहे. सोमवारी शहरात 30 अंश कमाल, तर 14.5 अंश किमान तपमानाची नोंद झाली.
शहरात मंगळवारी किमान तपमान 15 अंशाच्या जवळपास असणार आहे. तसेच बुधवारी किमान तपमान 16 अंश असेल. गुरूवारपासून रविवारपर्यंत किमान तपमान 17 अंश असणार असल्याचा अंदाज वेधशाळेने वर्तविला आहे. शहर आणि परिसरात येत्या रविवारपर्यंत दुपारनंतर आकाश अंशत: ढगाळ असणार आहे.
दरम्यान, राज्यात हवामान कोरडे होते. मागील 25 तासात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यात किमान तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. विदर्भ, मराठवाड्यात किमान तपमानात किचिंत वाढ झाली. राज्यात काल वाशिम येथे निच्चांकी 11 अंश किमान तपमानाची नोंद झाली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा