नवी दिल्ली : मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी गोवा सरकारविरोधात गंभीर आरोप केला. गोव्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार होत आहे. गोव्यातील भ्रष्टाचारावर बोलल्यानेच मला राज्यपालपदावरून हटविण्यात आले, हकालपट्टी झाली, असा दावा मलिक यांनी केला. कोरोना काळात तर भ्रष्टाचाराने कळस गाठला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणी लक्ष घालावे, असे ते म्हणाले.

मलिक म्हणाले, गोव्यातील भाजप सरकार कोरोना परिस्थिती योग्य पद्धतीने हाताळू शकले नाही. मी हे खूप विचारपूर्वक बोलतोय आणि मी माझ्या विधानावर ठाम आहे. गोवा सरकारने जे काही केले त्यात प्रचंड भ्रष्टाचार झाला. गोवा सरकारवर झालेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे मला गोव्याच्या राज्यपालपदावरून हटविण्यात आले, हकालपट्टी झाली. मी लोहियावादी आहे, चरणसिंग यांच्यासोबत मी काम केले आहे, मी भ्रष्टाचार सहन करू शकत नाही, असे मलिक म्हणाले. ‘गोवा सरकारची घरोघरी रेशन वाटपाची योजना अव्यवहार्य होती. सरकारला पैसे देणार्‍या कंपनीच्या सांगण्यावरून हे केले गेले. माझ्याकडे काँग्रेससह इतर पक्षांनी चौकशीशी मागणी केली होती. मी चौकशी करून पंतप्रधानांना माहिती दिली, असेही त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा