२ अद्याप बेपत्ता

डेहराडून : उत्तराखंडच्या लिमखागा खिंडीत ट्रेकिंगला गेलेल्या ११ गिर्यारोहकांचा मृत्यू झाला आहे. एकूण १७ गिर्यारोहक ट्रेकिंगवर गेले होते. त्यापैकी ४ जणांना वाचवण्यात यश आले, तर २ जण अद्याप बेपत्ता आहेत. गिर्यारोहकांना शोधण्यासाठी राज्य आपत्ती प्रतिसाद दलाकडून (एसडीआरएफ) उत्तराखंडच्या उंच टेकड्यांवर अजूनही शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.

एसडीआरएफच्या एका टीमने पायीच शोध मोहिम सुरू केली होती. दुसरी टीम हेलिकॉप्टरने त्यांचा शोध घेत होती. परिसरात दळणवळणाचे कुठलेही साधन नसल्याने एसडीआरएफच्या पथकांना सॅटेलाइट फोनद्वारे माहिती दिली जात होती. एसडीआरएफचे वरिष्ठ अधिकारी क्षणोक्षणी बचाव कार्याचे निरीक्षण करत होते आणि टीमना आवश्यक निर्देश देत होते.१७ गिर्यारोहकांपैकी दोन अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यासाठी हवाई दलाचे ALH हेलिकॉप्टर २३ ऑक्टोबरला पुन्हा एकदा शोधमोहीम सुरू करेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा