एम्समध्ये दाखल

नवी दिल्ली : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना ताप आल्यानंतर दिल्लीतील एम्समध्ये दाखल केले. त्यांना दोन दिवसांपूर्वी ताप आला आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने आज त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती एम्सकडून देण्यात आली आहे.

मनमोहन सिंग यांना या वर्षी कोरोनाचा संसर्ग झाला होता. १९ एप्रिलला कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केले होते. यानंतर २९ एप्रिलला त्यांना एम्सच्या ट्रॉमा सेंटरमधून घरी सोडण्यात आले. माजी पंतप्रधानांनी ४ मार्च आणि ३ एप्रिलला कोरोना लसीचे दोन डोस घेतले होते.

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग हे ८८ वर्षांचे आहेत आणि त्यांना मधुमेह आहे. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यावर दोन बायपास शस्त्रक्रिया देखील झाल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा