नवी दिल्ली : देशात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.06 टक्क्यांवर पोहोचले असून मृत्युदर 1.33 टक्के इतका आहे. देशात सध्या 0.61 टक्के म्हणजे 2 लाख 7 हजार 653 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 15 हजार 823 नवे रुग्ण आढळून आले. तर, 226 जणांचा मृत्यू झाला. गेल्या 24 तासांत 22 हजार 844 रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण रुग्णसंख्या 3 कोटी 40 लाख 1 हजार 743 वर पोहोचली. त्यापैकी, 3 कोटी 33 लाख 42 हजार 901 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर आतापर्यंत 4 लाख 51 हजार 189 जणांचा कोरोनामुळे बळी गेला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा