४६ नागरिकांचा मृत्यू तर बरेच नागरिक जखमी

दक्षिण तैवानमध्ये गुरुवारी १३ मजली निवासी इमारतीत भीषण आग लागली. यामध्ये ४६ लोकांचा मृत्यू झाला. या घटनेत १२ पेक्षा अधिकजण जखमी झाले आहेत. काऊशुंग शहर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, आग पहाटे तीनच्या सुमारास लागली. आग खूप भीषण होती, ज्यामुळे इमारतीचे अनेक मजले जळून खाक झाले.

तैवानच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, या आगीत ४६ जणांचा मृत्यू झाला आणि सुमारे ४१ जण जखमी झाले. त्याचवेळी अग्निशमन विभागाचे प्रमुख ली चिंग-सियू यांनी सांगितले की, ११ जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह शवागारात पाठवण्यात आले आहेत.

अग्निशमन दलाचे जवान शोध आणि बचाव कार्यात गुंतलेले आहेत. मात्र आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. पण प्रत्यक्षदर्शींनी स्थानिक माध्यमांना सांगितले की त्यांनी पहाटे ३ वाजता स्फोट झाल्याचा आवाज आला होता. अधिकृत निवेदनानुसार, इमारत सुमारे ४० वर्षे जुनी होती, तळमजल्यावर दुकाने आणि वरच्या बाजूला अपार्टमेंट्स होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा