किनौर :देशभरात कोरोना लसीकरण मोहीम जोरदार सुरू आहे. त्यासाठी १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्टही ठेवले जात आहे. आता देशातील एका जिल्ह्याने १८ वर्षावरील १०० टक्के लसीकरण पूर्ण झाल्याची माहिती दिलीय. त्यामुळे अशी कामगिरी करणारा हा जिल्हा देशातील पहिला जिल्हा ठरलाय. किनौर असे या हिमाचल प्रदेशमधील जिल्ह्याचे नाव आहे. जिल्हा प्रशासनाने बुधवारी (१३ ऑक्टोबर) याबाबत माहिती दिली. हा टप्पा गाठणारा हा पहिला जिल्हा ठरला आहे.

किनौर जिल्ह्यात १८ वर्षांवरील लोकसंख्या ६० हजार ३०५ इतकी आहे. या सर्वांना जिल्हा प्रशासनाने कोरोना वरील लसीचे दोन डोस दिले आहेत. विशेष म्हणजे या जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी १०० टक्के लसीकरणाचा टप्पा गाठण्यासाठी अगदी डोंगर दऱ्या पार करुन मोहीम राबवली. या जिल्ह्यात डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात पशूपालन करणारा समूह राहतो. त्यांची संख्या मोठी होती. त्यामुळेच ते राहत असलेल्या ठिकाणी जाऊन लसीकरण मोहीम राबवण्यात आली.
हिमाचल प्रदेश सरकारने दिलेल्या ऑगस्टमध्ये पहिल्या डोसचे १०० टक्के लसीकरण झाल्याची घोषणा केली होती. यात १८ वर्षांवरील सर्वांचा समावेश आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा