काँग्रेस शिष्टमंडळाने घेतली राष्ट्रपतींची भेट

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील लखीमपूर-खेरी हिंसाचार प्रकरणी केंद्रीय गृह खात्याचे राज्यमंत्री अजय मिश्रा यांना तातडीने बडतर्फ करण्यात यावे. या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या दोन विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेस शिष्टमंडळाने बुधवारी राष्ट्रपतींकडे केली.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली पक्षाच्या शिष्टमंडळाने काल राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची राष्ट्रपती भवनमध्ये भेट घेतली. तसेच, लखीमपूर-खेरी प्रकरणाशी संबधित निवेदन राष्ट्रपतींना सादर केले. या प्रकरणात राष्ट्रपतींनी हस्तक्षेप करून पीडितांना न्याय द्यावा, असे आवाहन पत्राद्वारे करण्यात आले. गेल्या 3 ऑक्टोबर रोजी लखीमपूर-खेरीमध्ये झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला. यात चार शेतकर्‍यांचा समावेश आहे. मुख्य आरोपी आशिष मिश्रा यास 9 ऑक्टोबर रोजी 11 तासांच्या चौकशीनंतर अटक करण्यात आली. सध्या त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा